राजकारण

अजित पवार संतापले!

27 जून: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकरांवर उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले आहेत. त्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केलीय. शरद पवार यांना महाराष्ट्र आणि देश ओळखतो ज्या माणसाची योग्यता नाही त्याने काय बोलावे. सूर्याकडे पाहून थुंकण्याचा हा प्रकार आहे. मोठा नेता असता तर गोष्ट वेगळी. त्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. म्हणजे तुम्ही ओळखू शकता. त्यांच्या वक्तव्याला जास्त महत्व देऊ नये. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना उत्तरं देतांना तोंडाला फेस आला. एखाद्याला नको तेवढे मोठ केल की असं होतं.अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी संताप व्यक्त केला.