असा असू शकतो अनलाॅक 2 प्लॅन
२७ जून :- कोरोनाबाधित रुग्णांचा वाढता आलेख लक्षात घेता अनलाॅक २ ची अत्यंत आवश्यकता असल्याचे दिसून येत आहे.१ जुलै पासून अनलाॅक २ सुरु होत आहे.प्रत्येकाच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे कसं असेल अनलाॅक २ चित्र? अनलाॅक २ मध्ये अजून नवं नवीन बदल पहिला मिळणार याची शक्यता नाकारणे शक्य नाहीच.कोरोना विषाणूच्या कचाट्यात अडकलेल्या महाराष्ट्राला हळू हळू सुयोग्य स्थितीत आणायचे काम सध्या ठाकरे सरकार करतच आहे.
महाराष्ट्रातले काही जिल्हे पुर्वपदावर आले आहेत. पण अजूनही अनेक जिल्हात परिस्थिती चिंताजनकच आहे.जिल्ह्यांतर्गत एसटी प्रवास सुरु असला तरी अडकलेल्या रोजगारागारासाठी एसटी प्रवास सुरु करण्याची तयारी अनलाॅक २ मध्ये असणार आहे.अनेक कंपन्याचे कर्मचारी हळू हळू कामावरू रुजू होत आहेत. पण त्यांना कामावर जाण्यासाठी बस,ऍटो रिक्षा याचा देखील विचार अनलाॅक २ साठी केला जातोय.परिस्थिती नुसार अनलाॅक २ मध्ये शाळे बाबत पण विचार योग्य असा विचार करण्यात येणार आहे.सध्या थोडीसी मोकळीक दिली तर लगेच गर्दी होताना दिसते.परिस्थिती बघून जिल्ह्यांच्या सीमांवर निर्णयअनलाॅक २ मध्ये घेण्यात येईल.