शिक्षकांना आठवड्यातून दोनदा शाळेत बोलवणार?
२५ जून :- कोरोना वाढत्या प्रादुर्भावाची पार्श्वभूमी लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा वैचार करत राज्यात अजूनही शाळा सुरु करण्यात आलेल्या नाहीत.राज्याचं शैक्षणिक वर्ष 15 जूनलाच सुरु झालं.आता लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर शिक्षकांच्या उपस्थितीबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यामध्ये काम सुरु करण्याची तयारी व ई लर्निंगबाबत मुख्याध्यापकांनी आठवड्यातून गरज पडल्यास दोन दिवस बोलवल्यास शिक्षकांना शाळेत उपस्थित राहावे लागणार आहे. यासंदर्भातील शिक्षण विभागाने नवे परिपत्रक जारी केले आहे. राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. अशा परिस्थितीत शिक्षण व शैक्षणिक वर्ष वेळेवर सुरू करण्याबाबत 15 जून 2020 शासन निर्णयान्वये घेतला आहे. यामध्ये मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी शाळा पूर्व तयारीच्या 15 दिवसांमध्ये कोणती कार्यवाही करावी, यामध्ये सष्ट केले आहे.