महाराष्ट्र

धक्कादायक;जुलै-ऑगस्टमध्ये होणार कोरोनाचा विस्फोट?

26 जून : राज्यात सध्याच कोरोनाबाधित रुग्नांच्या वाढत्या संख्येमुळे जनता चिंतेत आहे आणि प्रशासनाच्या नाकी नऊ आलेले आहेत.आणि आता नवीन आलेल्या धक्कदायक माहितीनुसार तर नक्कीच लोकांना जिवंतपणी मरण आल्यागत वाटू लागले आहे.कोरोना जुलै- ऑगस्टमध्ये कोरोना साथीचा विस्फोट होण्याची शक्यता आहे, महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉक्टर आणि ICU बेड्सची संख्या वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ची साथ अनलॉकनंतर सातत्याने वाढत आहे. पुढच्या आठवड्यात आता Unlock 2 अर्थात दुसऱ्या टप्प्यातल्या सूचना येणार आहेत. निर्बंध आणखी सैल होणार आहेत. त्यामुळे कोरोनारुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेपासून WHO स्थानिक पातळीवरील तज्ज्ञांनी कोरोनाच्या मोठ्या लाटेची शक्यता पुढच्या वर्षात वर्तवली आहे. त्यामुळे राज्यात या दृष्टीने अधिकचे वैद्यकीय तज्ज्ञ आणि ICU, व्हेंटिलेटर यांची सोय करण्यात येत आहे, असं टोपे म्हणाले.

काळजी घ्या…गर्दी टाळा…मास्क वापरा…सोशल डिस्टन्स ठेवा…स्वस्थ रहा…प्रशासनाच्या सूचनेचं पालन करा!

One thought on “धक्कादायक;जुलै-ऑगस्टमध्ये होणार कोरोनाचा विस्फोट?

  • Ramdas Salunke

    Very nice Service of Dainik zunjar neta paper

Comments are closed.