महाराष्ट्र

धक्कदायक! कारागृहात आरोपीचा मृत्यू

२६ जून :-कोरोना विषाणूच्या महामारीने देशभरात लोकांच्या मृत्यूचे संख्या वाढत चालली आहे.मात्र मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटातील आरोपी युसूफ मेमन (वय-54) याचा मृत्यू झाला आहे. नाशिक कारागृहात तो शिक्षा भोगत होता. कारागृहात सकाळी युसूफ मेमन याला हृदयविकाराचा झटका आहे. त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. युसूफचं शव विच्छेदन धुळे शासकीय महाविद्यालयात होणार आहे.