Popular News

धक्कादायक;गोविंदाच्या कारचा अपघात

24 जून : अभिनेता गोविंदाच्या कारला अपघात झाला आहे. गोविंदाचा कारला मागून दुसरी कार धडकली आहे. ही दुसरी कार यशराजची असल्याचं सांगितलं जातं आहे. रात्री आठच्या दरम्यान जुहूमध्येच ही घटना घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार गोविंदाची कार पुढे होती आणि मागून ‘यशराज’ची कार होती. यशराजच्या कारने गोविंदाच्या कारला धडक दिली. गोविंदाच्या कारला अपघात झाला तेव्हा कारमध्ये गोविंदा नव्हता. मात्र त्याचा मुलगा यशवर्धन आहुजा गाडीत होता आणि कार ड्रायव्हर चालवत होता. अचानक या कारला यशराजची कार मागून येऊन धडकली. ही कार ड्रायव्हर चालवत होता.दरम्यान या कार अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही आहे. कारचं थोडं नुकसान झाल्याचं सांगितलं जातं आहे.अपघातानंतर दोन्ही पक्षांनी हा वाद आपसात मिटवला आहे. अपघातप्रकरणी कोणतीही तक्रार नोंदवण्यात आली नाही, अशी माहिती जुहू पोलिसांनी दिली आहे.