बीड

राज्यात कोरोनमुक्त आणि कोरोनाबाधितांची विक्रमी नोंद!

२५ जून :- देशात सर्वत्र कोरोनाचा कहर सुरु आहे मात्र राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी रुग्ण बरे होण्याचा वेग वाढला आहे.मात्र कोरोनाची लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या हि वाढतेच आहे.आज दिवसभरात 3661 रुग्नांना कोरोनमुक्तीची पावती मिळाल्याने राजाला आज दिलासा मिळाला आहे.तर आज राज्यात नव्याने दिवसभरात 4941 रुग्ण आढळले. ही आतापर्यंत झालेली सर्वाधिक रुग्णवाढ आहे.आतापर्यंत 77 हजार 453 रुग्ण बरे झाले आहेत.अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
काळजी घ्या…गर्दी टाळा…मास्क वापर…सोशल डिस्टन्स ठेवा….प्रशासनाच्या सूचनेचे पालन करा!