Popular News

रेल्वेने घेतला लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय!

२५ जून :- कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावा पासून वाचण्याकरिता देशात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले होते.पण देशात लॉकडाऊन केल्यानंतरही कोरोनाचे थैमान वाढतच गेले.प्रशासनाच्या अथक प्रयत्नानंतरही कोरोनाचा कहर काही केल्या मात्र आटोक्यात आला नाही.त्यातच लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं पार कंबरडं मोडलं आहे.सर्व सामान्यांना यानंतर आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.त्यामुळे सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली. मात्र अशा स्थितीतच रेल्वेकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.येत्या 12 ऑगस्टपर्यंत रेल्वेप्रवास करता येणार नाही.पॅसेंजर, मेल एक्स्प्रेस, उपनगरीय रेल्वे गाड्या 12 ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. कॉइन विषाणूच्या वाढत्या संख्येमुळे जवळपास 3 महिन्यांपासून रेल्वेची सामान्य सेवा बंद आहे. त्यातच रेल्वेने लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.