Popular News

अबब…! सुशांत घेणार राखी सावंतच्या पोटी पुनर्जन्म

हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सर्वांना धक्का बसला आहे.अजूनही सर्वत्र सुशांतच्या आत्महत्येचा शोक व्यक्त होत आहे.सुशांत आत्महत्या प्रकरणाचा खोलवर तपास सुरु आहे.आणि आता मध्येच हिंदीचित्रपट सृष्टीतील अनोखा आजूबा असणाऱ्या राखी सावंतने दावा केला केला की- सुशांत राजपूत माझ्या स्वप्नात आला मी घाबरून पाहिलं आणि मला धक्का बसला.मग सुशांत बोलू लागला सुशांत मला म्हणाला राखी तू लवकर लग्न कर मला तुझ्या पोटी पुनर्जन्म घ्यायचा आहे.तू माझ्या चाहत्यांपर्यंत हा संदेश पोहचवास अशी माझी इच्छा आहे.राखी सावंतने इंस्टाग्राम वर दावा केला आहे की सुशांतचा पुनर्जन्म होणार आणि तो माझ्या पोटातून होणार आहे, या पुळचट दाव्या नंतर सुशांतच्या चाहत्यांमध्ये संताप निर्माण झाला असून इंस्टाग्राम वर राखी सावंतला ट्रोल करण्यात येत आहे.