Popular News

चित्रपट,मालिकाच्या शूटिंगला प्रारंभ!

२५ जून :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावा पासून बचाव करण्याकरीता चित्रपट,मालिका,शो च्या शूटिंग करण्यास मनाई केली होती.लॉकडाऊनदरम्यान ठप्प झालेली चित्रपटसृष्टीतील कामे पुन्हा सुरु झाले आहेत.राज्य सरकारने अनेक अटी-शर्तींच्याअधीन राहून चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, चित्रीकरणास मान्यता दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे मनोरंजन, चित्रपट क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे”, असं सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख म्हणाले.