मोदी सरकारने केली मोठी घोषणा!
25 जून :- कोरोनाच्या महारीमध्ये सर्वसामान्य जनतेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.याच पार्शवभूमीवर देशातील तरुणांना स्वावलंबी बनवण्याच्या हेतूने मोदी सरकारने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारने व्याज अनुदान योजनेसह 15,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा अनुदानाची घोषणा केली आहे. यामागे खासगी व्यापाऱ्यांना आणि MSME मध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे उद्दीष्ट आहे. या पुढाकाराने तरुणांसाठी रोजगाराच्या 35 लाख संधी निर्माण होतील. हा निधी लॉकडाऊनने बाधित झालेल्यांना मदत करण्यासाठी मे महिन्यात जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या प्रोत्साहन पॅकेजचा एक भाग असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.