Fair & Lovely कंपनीने घेतला मोठा निर्णय!
२५ जून:-Fair & Lovely …Fair & Lovely…असं आपण लहानपण पासून ऐकत आलो आहोत.टीव्ही वरील जाहिरात,सर्व दुकान,मेडिकल मध्ये सहज उपलब्ध होणारी देशातील महिलेबरोबर पुरुषांचीही लोकप्रिय असणारी Fair & Lovely कंपनीने चक्क तब्ब्ल ४५ वर्षानंतर आपलं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.1975 साली म्हणजे 45 वर्षांपूर्वी हिंदुस्तान युनिलिव्हरने एक गोरं करणारी क्रिम म्हणून फेअर अँड लव्हली लाँच केली होती. मात्र फेअर अँड लव्हलीमधील फेअर या शब्दामुळे गोरेपणा आणि उजळपणावर जास्त भर दिला जातो आहे. त्यामुळे कंपनीवर अनेकदा रंगभेद करत असल्याची, गोरेपणाच्या आकर्षणाचा व्यापार करत असल्याची टीकाही झाली. त्यामुळे आता आपल्या या ब्रँडचं नाव बदलण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. लवकरच यातून फेअर हा शब्द काढला जाणार आणि नवं नाव दिलं जाणार आहे.