राजकारण

नरेंद्र मोदींवर आंबेडकरांनी केला गंभीर आरोप!

२५ जून :- वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले आहेत.देशात कोरोनाच्या संसर्गाला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असून त्यांच्यावर कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करा, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आणून कार्यक्रम केला, त्यामुळे भारतात कोरोनाचा शिरकाव झाला. त्याला पंतप्रधान जबाबदार आहेत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.