‘या’ भारतीय खेळाडूला करायची होती आत्महत्या
२५ जून :-केवळ बॉलिवूड स्टार्सच नाही तर भारतीय क्रिकेटरही नैराश्येचे बळी पडले आहेत. अशाच एक क्रिकेटपटूनं, “काही काळ मी ही नैराश्येत सुसाइड करण्याच्या विचारात होतो”, असा धक्कादायक खुलासा केला आहे.भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा जलद गोलंदाज मोहम्मद शमी वैयक्तिक आयुष्यामुळं नैराश्येत होता. त्याचा परिणाम त्याच्या खेळावरही झाला होता. यातूनच अनेकवेळा त्याच्या डोक्यात आत्महत्या करण्याचे विचार आले. काही दिवसांपूर्वी शमीनं याबाबत एक मुलाखतीत माहिती दिली होती.