महाराष्ट्र

राज्य मंत्रिमंडळानं घेतला मोठा निर्णय!

२५ जून :- वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या काळात बंद असलेल्या जिम आणि सलून सुरू करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठी निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात येत्या रविवारपासून म्हणजेच 28 जूनपासून जिम आणि सलून सुरु करण्यास राज्य सरकारनं परवानगी दिली आहे.राज्यात कोरोना विषाणूचा कहर सुरु असताना राज्य मंत्रीमंडळाने घेतलेला हा निर्णय वैचार करायला लावणारा आहे.