अबब…! मुंबईच्या वेशीपर्यंत आणखी एक आजार येऊन ठेपला
२४ जून :- राज्यात सर्वात जास्त कोरोनाच थैमान मुंबई शहरात सुरु आहे.आरोग्य विभागाच्या अथक प्रयत्नानंतरही मूंबईमधील कोरोनाचा कहर कमी होत नाही आणि अशा भयाण परिस्थिती मध्ये मुंबई शहराच्या वेशीपर्यंत आणखी एक नवीन आजार येऊन ठेपल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे.मुंबईजवळील भिवंडी शहरात कोरोना पाठोपाठ सारी या आजाराने डोके वर काढले असून आता पर्यंत स्व. इंदिरा गांधी कोविड -19 शासकीय रुग्णालयात सारी आजाराचे 231 रुग्ण दाखल झाले त्यापैकी 31 जणां चा मृत्यू झाला आहे. तर 190 कोरोनाबाधित दाखल होऊन त्यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे.हजिकच कोरोनापेक्षा सारीचे रुग्ण अधिक असून मृतांची संख्याही अधिक असताना त्यासाठी भिवंडीत वेगळी आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात शासन पातळीवर अजूनही कोणतीही उपाययोजना होत नसल्याने येथील परिस्थिती गंभीर होत चालली आहे.