मोदी सरकारचा देशहितासाठी मोठा निर्णय!
२४ जून :-देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने बँकांसंदर्भातला मोठा निर्णय आज बैठकीत घेतला.सहकारी बँकांचा आतापर्यंत रामभरोसे असणारा कारभार रिझर्व बँकेच्या देखरेखीखाली येणार आहे.सरकारने नवा अध्यादेश काढून 1,540 सहकारी बँकांना रिझर्व बँकेच्या अधिपत्याखाली आणलं आहे. सहकारी बँका दिवाळखोरीत निघाल्या किंवा गैरव्यवहार झाला तर सामान्य ग्राहकांचे पैसे बुडतात. त्यावर आता RBI चं नियंत्रण असेल. त्यामुळे सहकारी बँकांमधला पैसाही सुरक्षित राहील, अशी व्यवस्था सरकारने केली असल्याचं जावडेकर म्हणाले. खातेदारांच्या चिंता दूर करण्याच्या दृष्टीने मंत्रिमंडळ बैठतीत निर्णय घेण्यात आला,