राहुल गांधीं,सोनिया गांधी विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल!
24 जून :- चीनविरोधात सुरू असलेल्या तणावादरम्यान काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.एका वकिलांच्या वतीने दाखल केलेल्या या याचिकेत 2008 मध्ये यूपीए सरकार आणि चिनी सरकार यांच्यात झालेल्या करारासंदर्भात माहिती मागविण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून एनआयए आदेश किंवा सूचना देण्याची मागणी करण्यात आली आहे.