बीड

सुशांत आत्महत्ये बाबत डॉक्टरांचा नवीन खुलासा!

दि.२४ जून :- बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास खोल वर सुरु असून सुशांतच्या मृत्यूबद्दल अनेक संशय व्यक्त करण्यात येत असल्याने पोलिसांनी त्या दृष्टीनेही तपास सुरू केला आहे.या प्रकरणात 5 डॉक्टरांच्या टीमने पुन्हा एकदा पोस्टमार्टम रिपोर्टचा अभ्यास करून त्याबाबतचं निरीक्षण समोर ठेवलं आहे.पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, सुशांतच्या शरीरावर गळा दाबण्याच्या किंवा नखाच्या कोणत्याही जखमा नाहीत, असंही या टीमकडून सांगण्यात आलं आहे. या प्रकणात आतापर्यंत 23 लोकांचा जबाब नोंदवण्यात आला असला तरीही अजूनही काही लोकांची चौकशी करण्यात येणार आहे.