राजकारण

पडळकरांच्या विखारी टीकेनंतर फडणवीस संतापले!

दि.२४ जून :- भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांच्या विकारी टीकेनंतर राष्ट्रवादीमधील अनेक नेत्यांनी वृत्त वाहिन्यांवर संताप व्यक्त करत पडळकरांचा चांगलाच समाचार घेतला.राज्यात अनेक ठिकाणी पडळकरांच्या पुतळ्याचेही दहन करण्यात आले.याच दरम्यान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त करत गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य अत्यंत चुकीचे होते. त्यांच्याशी मी चर्चा केली आहे. शरद पवार साहेब हे राजकीय विरोधक आहे, शत्रू नाही.ज्येष्ठ नेत्यांबद्द्ल असे बोलणे चुकीचे आहे.पडळकर यांनी भावनेच्या भरात वक्तव्य केले असून त्यांनी याबद्दल माफी मागितली आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.