राज्यसभेतील 16 खासदार गुन्हेगार?
दि.२४ जून :- राज्यसभेत 2020 वर्षात नव्याने आलेल्या 62 खासदारांपैकी 16 खासदारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.निवडून आलेल्या खासदारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रांनुसार, या खासदारांविरुद्ध कोर्टात गंभीर गुन्हेगारीचे खटले प्रलंबित आहेत त्यात खून, बलात्कार, खून करण्याचा प्रयत्न आणि दरोडा सारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. राजधानी दिल्लीतील असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने विश्लेषणाद्वारे ही माहिती समोर आली आहे.