राजकारण

सावकाराने शेतकरी महिलेचा विनयभंग करत केली मारहाण!

दि.२४ जून :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावा पासून वाचण्याकरिता देशभर लॉकडाऊन करण्यात आले होते.या बंद मुले सामान्य लोकांचा रोजगार बुडाल्याने सामान्यांना अनेक आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील वाकेश्वर येथे तथाकथित अवैध सावकार आणि एका शेतकऱ्याच्या भांडणात शेतकऱ्याच्या पत्नीला मारहाण केल्याचा आणि तिची साडी सोडण्याचा निंदनीय प्रकार घडला. 2017 साली सावकार आणि शेतकरी यांच्यातील कर्ज प्रकरणातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. शेतकरी दाम्पत्याने या घटनेची तक्रार केल्यानंतरही पोलिसांनी या घटनेत कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.
भिवापूर तालुक्यातील वाकेश्वर गावातील शेषराव या शेतकऱ्यानं उमरेड मधील सावकार अभयचंद्र पाटील या सावकराकडून 2 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्यासाठी त्यांनी आपली दोन एकर शेती त्यांच्याकडे गहाण ठेवली. मात्र, सावकारानं शेतकऱ्याची जमीन गहाण न ठेवता धोक्यानं आपल्या नावानं रजिस्ट्री करून घेतली. दोन वर्षानंतर जेव्हा शेतकरी कर्जाची रक्कम घेऊन गेला. त्यावेळी या सावकारानं जमीन आपल्या मालकीची असल्याचं सांगितलं. त्यामुळं शेतकऱ्याला धक्का बसला. दरम्यान या वर्षी लवकर पाऊस दाखल झाल्यानंतर शेतकऱ्यानं पत्नीसह शेतात पेरणी केली. मात्र, या सावकारानं 20 जून रोजी ट्रक्टरनं शेतकरी दाम्पत्याने केलेली पेरणी नष्ट केली. तसंच सावकाराने दोघांना शेतात येण्यास मज्जाव केला. सावकाराच्या पत्नीने (प्राजक्ता) शेतकऱ्यांच्या पत्नीला मारहाण केली असा आरोप शेतकऱ्याच्या पत्नीने केला आहे. सावकार आणि तिच्या पत्नीने माझ्या अंगावरील साडी सोडली, असा आरोपही शेतकऱ्याच्या पत्नीने केला आहे.घटनेच्या तीन दिवसानंतर शेतकरी दाम्पत्याने घटनेची तक्रार भिवापूर पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. मात्र, तरी ही पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही.