महाराष्ट्र

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

दि.२४ जून :- लॉकडाऊन काळात सर्वकाही बंद असल्याने सर्व सामान्य माणसाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.सध्या सामान्य माणसास आर्थिक अडचणींना तोंड देणे दिवसेंदिवस कठीण होऊ लागले आहे. म्हणून सध्या सर्व सामान्य लोकांची मनोवृत्ती विक्षिप्त होत चालली आहे.आपल्या राहत्या फ्लॅटचे हप्ते देऊ न शकल्याने झालेला वाद अन् त्यात शेजारी-पाजारी राहणाऱ्या महिला चारित्र्यावर संशय घेत टोमणे मारत असल्यामुळे पुण्यातील आंबेगाव खुर्द परिसरात एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैशाली राऊळ (वय 30) पती रिक्षाचालक तर मृत महिला ब्युटी पार्लर चालवत होती. तीन वर्षांपूर्वी त्यांनी शृष्टीलेक अपार्टमेंटमध्येच फ्लॅट घेतला होता. दरम्यान अचानक लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळे रिक्षा थांबली, ब्यूटी पार्लरही चालनासे झाले. परिणामी घराचे हप्तेही थकले होते. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेच्या पतीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.