Popular News

प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान रुग्णालयात दाखल!

दि.२४ :- हिंदी सिनेसृष्टीती मध्ये माधुरी दीक्षित,गोविंदा,सलमान खान,करिष्मा कपूर,ऐश्वर्या राय अशा अनेक आघाडीच्या लोकप्रिय तारे-तारकांना नृत्याचे धडे देणाऱ्या प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांची प्रकृती खालावली आहे. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने मुंबईतील वांद्रे येथील गुरुनानक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत आहे.