Popular News

क्रिकेट जगतात कोरोनाचं थैमान;10 खेळाडू कोरोनाच्या विळख्यात!

22 जून : क्रिकेट जगतात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्याची अत्यंत खळबळजनक बातमी पाकिस्तानातून आली आहे. इंग्लंड दौऱ्याची तयारी सुरू असतानाच पाकिस्तानच्या 3 खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याची बातमी आली होती. त्याला 24 तास उलटण्याच्या आत संघातल्या इतर 7 खेळाडूंनाही कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बातमी आली आहे.