रामदेव बाबांच्या सावळ्या गोंधळास आयुष मंत्रालयाचा दणका!
२३ जून :- मोठा गाजावाजा करत आज रामदेव बाबांनी कोरोनावर आयुर्वेदिक औषध पतंजलीनं तयार केल्याचा दावा केला. मात्र अवघे चार-पाच तास उलटायच्या आतच केंद्रीय आयुष मंत्रालयानं या औषधाची जाहीरात थांबवण्याचे आदेश दिले आहेत. जोपर्यंत या औषधाची नीट चाचपणी होत नाही, तोपर्यंत ही जाहीरात थांबवण्याचे आदेश देण्यात आले.आज दुपारी पत्रकार परिषदेत हरिद्वारमध्ये रामदेवबाबांनी हे औषध जगासमोर आणलं. त्यावेळी हे औषध सगळ्या मेडिकल चाचण्यांनी प्रमाणित असल्याचाही दावा त्यांनी केला. पण या औषधाला नेमकं कुणी प्रमाणित केलं आहे.इंडियन मेडिकल कौन्सिलनं याबाबत आधीच कानावर हात ठेवले होते. त्यातच ज्या आयुष मंत्रालयाच्या अधिकारात हा सगळा विषय येतो त्यांनी आता याबाबत पतंजलीकडून स्पष्टीकरण मागवलं आहे.