Popular News

प्रसिद्ध टेनिसपटू कोरोनाच्या विळख्यात!

२३ जून :- जगामध्ये सर्वत्रच कोरोनाचे थैमान सुरु आहे.गरीब,श्रीमंत,सेलिब्रिटी आणि कुठल्याही जाणीव कोणत्याही क्षेत्रातील माणसास कोरोनाने सोडले नाही.प्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविचला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. नोवाक जोकोविचने सोमवारी आपली कोविड 19 टेस्ट केली होती, ती पॉझिटिव्ह आली आहे. जोकेविचशिवाय त्याची पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जोकोविचच्या मुलांची कोविड टेस्ट निगेटिव्ह आली आहे.