Popular News

शूटिंग बंद! स्टारडम विसरून शेतात कष्ट करतोय हा स्टार अभिनेता

२३ जून:-कोरोनाच्या महामारीमध्ये देशात सर्वत्रच विक्षिप्त घटना घडत असल्याचे चित्र दिसत आहे.यातच हिंदी चित्रपट सृष्टीतील सिनेमांच्या शूटिंग सध्या बंद आहे.कलाकारांना सध्या मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आयुष्य जगावे लागत आहे. लॉकडाऊन काळात नवाजुद्दी सिद्दीकी त्याच्या मूळ गावी म्हणजे मुजफ्फरनगरला गेलेला होता. तेव्हापासून तो तिथेच आहे. शूटिंग बंद असल्याने,हातात काही काम नसल्याने आणि पुढील काम केंव्हा सुरु होईल याचा अंदाज नसल्याने नवाजुद्दी सिद्दीकी आपला स्टारडम विसरून शेतात अहोरात्र कष्ट घेत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.