Popular Newsमहाराष्ट्र

कोरोनाबाधिताच्या घरातच चोरट्यांनी केला हात साफ!

२३ जून :- जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे.सर्व सामान्यांना अनेक आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.अशातच जालना जिल्हातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 400 च्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. दुसरीकडे चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे.एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारून सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह सुमारे पावणे सात लाखांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.


दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड