बीड

मनसेचं आंदोलन!

२३ जून :- कोरोनाच्या महामारीत सर्व सामान्य जनतेस आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.आणि त्यामध्ये सरकारने सलग 17 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यानं नागरिकांमध्ये संतप्त वातावरण आहे.याच पार्शवभूमीवर मनसेने ठाणे,सांगली, रत्नागिरी येथे सरकार विरोधात आंदोलन छेडले आहे.मनसे कार्यकर्त्यांनी हातगाडीवर स्कूटर ठेऊन हातगाडी ढकलत पेट्रोल पंपावर आणून सरकारच्या दर वाढी चा निषेध केला. आंदोलन करताना केवळ चार आंदोलकांना पोलिसांनी परवानगी दिली होती त्यामुळे चार मनसैनिकांनी हे आंदोलन केले.सरकार प्रत्येकी एक लिटर पेट्रोल, डिझेलने 32-35 रुपये सरचार्ज, सेस, एक्साईज ड्युटी घेते. यातून सरकार 10 रुपये कमी करुन त्याचा लाभ जनतेला देऊ शकते, किमान या कोरोना काळात तरी सरकारने असं कार्याला नको आहे.