गूड न्यूज… पूर्व लडाखमधून चीन सैन्य मागे घेण्यास तयार!
नवी दिल्ली | सोमवारी भारतीय लष्कराने भारत आणि चीन यांच्यात कमांडर स्तरावर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती दिली आहे. या चर्चेदरम्यान सैन्य मागे घेण्याचं दोन्ही मत एकमत आहे. सैन्य मागे घेण्याबाबत चर्चा झाली असून दोन्ही बाजू यांची अंमलबजावणी करतील, असं भारतीय लष्कराकडून सांगण्यात आलं आहे.
सोमवारी चीनच्या हद्दीतील मोल्डो भागात भारत आणि चीनमध्ये लेफ्टनंट जनरल स्तरावरील बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान काही मुद्द्यांवर भारत आणि चीन यांचं एकमत झालं आहे. यामध्ये चीन आपलं सैन्य मागे घेण्यास तयार असल्याने भारतंही आपलं सैन्य मागे घेईल असं लष्करांद्वारे सांगण्यात आलंय.