रामदेव बाबांनी जगासमोर आणलं पहिल औषध, फक्त 3 दिवसांत कोरोना रुग्ण बरा होणार
नवी दिल्ली, 23 जून : Coronavirus Medicine: कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग हैराण आहे. भारतात या विषाणूची लागण होणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशात बाबा रामदेव यांनी कोरोनावर पहिलं औषध शोधलं असल्याचा दावा केला आहे. आज ‘कोरोनिल’ हे कोरोना विषाणूवर उपचार करण्यासाठी बनवलेले एक औषध त्यांनी लॉन्च केलं आहे. या विषाणूचा हरवण्यासाठी आयुर्वेदिक औषध प्रभावी आहे, असा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे.
आचार्य बालकृष्ण यांनी ट्विट केलेल्या ट्वीटनुसार, कोरोनावर आधारित पहिलं आयुर्वेदिक औषध मंगळवारी म्हणजेच आज लॉन्च केलं जाईल. हरिद्वारच्या पतंजली योगपीठात ही पत्रकार परिषद पार पडत आहे. पत्रकार परिषदेत बाबा रामदेव यांच्यासह आचार्य बालकृष्ण, औषधी चाचणीस उपस्थित असलेले वैज्ञानिक, संशोधक आणि डॉक्टरही उपस्थित आहेत. या आयुर्वेदिक औषधावर संशोधन पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूट आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, जयपूर यांनी संयुक्तपणे केलं आहे.
या औषधी वनस्पतींचा आहे समावेश: बालकृष्णांच्या म्हणण्यानुसार, ‘दिव्य कोरोनिल टॅब्लेट’ मध्ये अश्वगंधा, गिलोय, अणू तेल, श्वासारी रस आणि तुळसी यांसारख्या औषधी वनस्पतींचा समावेश आहे. कोरोनामध्ये संक्रमित रूग्णांमध्ये या औषधाबद्दल क्लिनिकल चाचण्या घेतलेल्यांमध्ये 100 टक्के निकाल पाहिले गेले आहेत.
3 दिवसांत संसर्ग बरा होणार
रामदेव बाबा यांनी असा दावा केला आहे की, कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण या औषधाच्या वापराने 3 दिवसांच्या आत बरे होतील. पुढच्या 7 दिवसांत कोरोना रुग्ण पूर्ण बरा होऊन घरी जाईल. कोरोनिल औषध सकाळी आणि संध्याकाळी एकदा घेतलं जाऊ शकतं. या औषधामध्ये असलेला अश्वगंधा या व्हायरसच्या रिसेप्टर बाइंडिंग डोमेनला शरीरातील अँजिओटेन्सीन कनवर्टिंग एंजाइमला शरीरात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करतं. तर गिलोय संक्रमण कमी करण्यास मदतगार आहे.