महाराष्ट्र

अबब..! 41 वर्षानंतर आजीबाई सापडल्या;

२२ जून :-वाचण्यास आणि ऐकण्यास जरी आश्चर्य वाटत असेल तरी सुद्धा सत्य हे सत्यच असते.94 वर्षाच्या नागपूरच्या पंचफुलाबाई ह्या साल 1979 मध्ये हरवल्या होत्या.आश्चर्यजनक म्हणजे तब्ब्ल 41 वर्षाच्या ह्या मोठ्या कालखंडानंतर आजीबाई सापडल्या आहेत.पांचूबाई हरवल्या तेव्हा वयाच्या 54 व्या वर्षात होत्या.पंचुबाई ह्यांना आधीपासूनच मानसिक रोग होता.या आजीबाईचा ऐकलंत एक मुलगा भैय्यालाल याने आपल्या आईचे उपचार करण्याकरिता गाव वरून नागपूर येथे आणले होते.22 जानेवारी 1979 च्या पहाटे पंचुबाई घरातून निघून गेल्या. खूप शोध घेतला पण सापडल्या नाही. पोलीस स्टेशन गाठले, इतर जिल्ह्यात शोध घेतला पण पंचुबाई सापडेना.वैतागून घरच्यांनी शोध थांबला आणि देवा वे सर्व काही सोडले

४१ वर्षाच्या कालखंडानंतर आजीबाई जबलपूर जवळच्या कोटाकाला गावाजवळील हायवेवर नूरसाहेब खान नावाच्या एका ट्रक ड्रायव्हरला सापडल्या.माणुसकीच्या नात्याने या ड्राइव्हर पांचूबाईना घरी घेऊन गेला.काही दिवस स्वतःकडे घरच्या सदस्य प्रमाणे वागणूज देऊन सांभाळ केला. काही दिवसानंतर तपास सुरु केल्यांनतर आजीबाईना नागपूर येथे त्यांच्या एकुलत्या एक मुलाकडे आणून सोडले.आजच्या जगात माणुसकी अजून शिल्लक असल्याची जाणीव नुरसाहेब या ट्र्क ड्राइव्हरने करून दिली आहे.आजीबाईना ४१ वर्षानंतर आपला परिवार मिळाला आणि सर्वानी आनंदाने राहियला सुरवात केली आहे. चित्रपटातील एखाद्या रंजक कहाणी सारखी हि कहाणी प्रत्यक्षात घडली आहे.