चीनसोबतच्या वादानंतर संरक्षणमंत्री रशियाला रवाना
२२ जून :- चीनसोबत वाद वाढलेला असताना आणि कोरोनाचे थैमान जगभरात सुरु असताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रशिया दौऱ्यावर रवाना झाले आहेत. रशियाकडून हवी असलेली S-400 ही अँटी मिसाईल सिस्टीम डोळ्यासमोर ठेऊन राजनाथ सिंह हे तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर निघाले आहेत. रशियात सोहळा आहे दुसऱ्या महायुद्धाच्या पंचाहत्तरीचा. त्याला चीनच्या संरक्षणमंत्र्यांनाही आमंत्रण आहे. पण भारतासाठी या दौऱ्यात एकच ध्येय असेल ते म्हणजे एस-400 रशियाकडून लवकरात लवकर मिळवणं.