Popular News

रतन टाटा यांचे देशाला आवाहन!

२२ जून :- भारत देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा नेहमीच देशाच्या सुख-दुखत सहभागी होतात कोरोनाच्या महारीमध्ये देशातील लोकांची विक्षिप्त होत चाललेली वृत्ती पाहता उद्योगपती रतन टाटा यांनी देशवासियांना आवाहन केले आहे. रत्न टाटा म्हटले यंदाचं वर्ष विविध आव्हानांनी भरलेलं आहे. ऑनलाईन माध्यमांवरील लोक एकमेकांना त्रास देत असल्याचे मला सातत्याने पाहायला मिळत आहे. एकमेकांना खाली खेचणं, टोकाची भूमिका घेणं आणि पटकन एखाद्याबद्दल मत बनवणं असे प्रकार सद्य घडतत आहेत, असं रतन टाटा यांनी म्हटलं आहे.अनेक संघर्षांनी भरलेल्या ह्या वर्षात खरं तर आपल्या एकमेकांच्या सहकार्याची गरज आहे.कुणीही कुणाला टीका करत बसने चुकीचे आहे.एकजुटीने संघर्षाशी दोन हात केल्यास आपण लवकरात लवकर सध्य परिस्थिती मधील संकटाला आपण मत देऊ शकतो असे देशहिताकरिता अहवाहन रतनजी टाटा यांनी इंस्टाग्रामवरील पोस्टच्या माध्यमातून केले आहे. इंस्टाग्रामवरील ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे.