महाराष्ट्र

शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय!

२२ जून : – कोरोना विषाणूचा दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सीईटी प्रवेश परीक्षा परीक्षा पुढे ढकलली आहे.

शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले की कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून या सर्व प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत,विद्यार्थी आणि पालकांकडून या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याविषयी सातत्याने मागणी होत होती. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून या सर्व परीक्षांच्या तारखा नव्याने जाहीर करण्यात येतील.