राजकारण

मनमोहन सिंग यांचा नरेंद्र मोदींना सल्ला

22 जून :- भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या वादावरुन भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांना देशहिताचा सल्ला दिला आहे. “आपल्या लोकशाहीची जबाबादारी पंतप्रधानांवर आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधानांनी सुरक्षा, सामरिक मुद्द्यांवर जपून बोललं पाहिजे,” असं मनमोहन सिंह म्हणाले.