महाराष्ट्र

अशोक चव्हाणांची हकालपट्टी करा

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या निकालाची सुनावणी 7 जुलैला होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने आपली बाजू कोर्टात मांडण्यासाठी काय तयारी केली? याची माहिती मराठा समाजाला मिळणे आवश्यक आहे. यासाठी मराठा आरक्षण उपसमितीची बैठक होणं महत्त्वाचं आहे. परंतु अद्यापही बैठक आयोजित करण्यात आलेली नाही.मराठा समाजाच्या हितासाठी अशोक चव्हाण यांनी आजपर्यंत एकही बैठक घेतलेली नाही. मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी एकाही नामवंत वकिलाची नियुक्ती केलेली नाही. लवकरात लवकर जर मराठा समाजाच्या हितासाठी आजपर्यंत अशोक चव्हाण यांनी काय निर्णय घेतले हे जाहीर करावे अथवा त्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदावरून हकालपट्टी करावी. जर आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलं तर आम्ही 9 ऑगस्ट रोजी मोठं जन आंदोलन महाराष्ट्रात उभं करु, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे-पाटील यांनी दिला.