Popular News

सुशांतच्या अभिनयाबाबद दीपिकाचं मोठं वक्तव्य

21 जून- सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. 14 जूनला सुशांतनं त्याच्या मुंबईतल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर सोशल मीडियावर नेपोटिझमचा वाद उभा राहिला आणि त्यानंतर आता सुशांतचे अनेक थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. असाच दीपिकाचा सुद्धा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात सुशांतच्या अभिनयाबाबत दीपिकानं आपलं मत व्यक्त केलं होतं.सुशांतच्या फॅनपेजवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ दीपिकाच्या एका जुन्या मुलाखतीचा आहे. जिथे तिला विचारण्यात आलं होतं की, परफॉर्मन्ससाठी तू कोणत्या अभिनेत्याला सर्वाधिक रेटिंग देशील. त्यावर दीपिका सुशांतचं नाव घेते आणि सांगते, मला सुशांत सिंह राजपूतचा अभिनय खूप आवडतो.