नरेंद्र मोदींचा कोरोनाला हरवण्यासाठी नवा मंत्र!
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिवस हा डिजिटल माध्यमातून साजरा करण्यात आला योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले.पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोरोना विषाणू आपल्या श्वसन संस्थेवर हल्ला करतो. श्वसन संस्था अधिक सक्षम करण्यासाठी योगाची मोठी मदत होते. यासाठी अनुलोम विनुलोम प्राणायम आहे. प्राणायमाचे असंख्य प्रकार आहेत. योगाची ही आसनं श्वसन संस्था मजबूत करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे प्रत्येकानं प्राणायमाला दैनंदिन आयुष्याचा भाग बनवावं. कोरोनाबाधितांना यातून बाहेर पडण्यासाठी ताकद मिळत आहे. योगामुळे मानसिक शांती मिळते. संयम व सहनशक्तीही मिळते, असंही मोदी म्हणाले.