अवघ्या 500 रुपयांसाठी केला खून!
रक्ताने माखलेला एक बेवारस मृतदेह आढळला. बघताच क्षणी ही हत्या झाल्याचं स्पष्ट झालं होतं. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून खिशातील सर्व वस्तू घेऊन हल्लेखोर पसार झाले होते. अशात पोलिसांच्या नजरेस मृतदेहाच्या शर्ट आणि पॅन्टवरील ‘प्रिन्स टेलर्स बीडब्ल्यूडी’ नावाचं टॅग आढळलं. या टॅगच्या आधारेच पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा- 5 ने हत्येचा छडा लावला. धक्कादायक बाब म्हणजे हैदराबाद येथून मुंबईला डॉन बनायला निघालेल्या तीन अल्पवयीन मुलांनी केवळ 500 रुपयांसाठी ही हत्या केल्याचं उघड झालं.