महावितरण विभागाचा झटका!
शहरातील एका लघुउद्योजकास महावितरण विभागाने विजेचा धक्का दिलाय. लघुउद्योजक बाबू जॉन यांच्या हातात महावितरणने एक-दोन लाखांचे नव्हे तर तब्बल 79 कोटी 7 लाखांचं बिल थोपवलं आहे. लॉकडाऊनमुळं बाबू जॉन यांची साई प्रोफाईल कंपनी अडचणीत आहे. अशात महावितरण विभागाच्या भोंगळ कारभाराने त्यांना दुहेरी झटका दिलाय. 29 जूनपर्यंत हे बिल अदा न केल्यास बाबूंना आणखी एक कोटींचे बुर्दंड बसणार आहे. त्यामुळं बाबूंनी हातातील कामं बाजूला ठेवत पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटनेकडे धाव घेतलीये. संघटनेने महावितरण विभागाशी संपर्क साधला. लॉकडाऊनमुळं तीन महिने मीटरचे रिडींग घेणे बंद होते, ते या महिन्यात घेण्यात यात गफलत झाली. असं कारण महावितरणने पुढे केले आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड