बीड

पोदार स्कूलचा ऑनलाईन “योग”

बीड (दि.२१) -वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना सुरू आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाने आॉनलाईन पध्दततीला मान्यता दिली.याच ऑनलाईन शिक्षणाला कल्पकतेची जोड देऊन बीडच्या पोद्दार स्कुलने आज जागतिक पातळीवर साजरा होत असलेल्या योग दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना योगा मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे अगळे-वेगळे वैशिष्ट्य म्हणजे पोदार स्कूलने विद्यार्थ्यांना Zoom App वर ऑनलाइन योगाचे मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन योगा करून घेतला.विशेष म्हणजे पालकांनी सुद्धा आपल्या मुलांसोबत यात उस्फुर्त पणे सहभाग नोंदवला.

पोदार स्कूलचे प्राचार्य श्री.बी.डी. कोटवानी सर,उप-प्राचार्य सुदर्शन खणगे सर यांनी सरस्वती पूजनाने योगदिनाचा प्रारंभ केला.सोशल डिस्टन्स ठेवत प्राचार्य,उपप्राचार्य समवेत काही मोजक्या शिक्षकांनी स्कूलच्या योगा शिक्षिका शीतल गोपीशेट्टी यांच्या मार्गदर्शना खाली स्वतः योगा करून आजचा योगदिन साजरा केला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन यास्मीन सय्यद मॅडम यांनी केले तर पोदार स्कूलचे परवेज खान सर,सचिन मार्गे सर,प्रताप रसाळ सर,मनीषा परसे मॅडम,पदमजा सोंळकी मॅडम यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.आॅनलाईन योगा मार्गदर्शन करणारी जिल्ह्यातील हि पहिलीच शाळा ठरल्याने पालक वर्ग सदर उपक्रमाचे कौतुक करत आहेत.
– दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड