News

एका दिवसात आढळले १३६ नवे रुग्ण

औरंगाबाद हा करोनाचा नवी हॉटस्पॉट ठरत चालला आहे. जिल्ह्यात रविवारी (२१ जून) सकाळी १३७ करोनाबाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ३४९७ झाली आहे. तर आतापर्यंत १८७ बाधितांचा मृत्यू झाला आहे. पैकी १८५७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत व सध्या १४५३ बाधितांवर उपचार सुरू आहे.

जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या १३७ बाधितांमध्ये वाळूज पंढरपूर येथे १, क्रांती नगर १, मिलकॉर्नर १, बनेवाडी १, एन-नऊ, सिडको २, शिवाजीनगर ४, न्यू विशाल नगर २, न्यू हनुमान नगर १, उस्मानपुरा ७, राजीव नगर ३, अबरार कॉलनी १, सातारा परिसर ३, जयसिंगपुरा ६, सुरेवाडी २, एन-१२, हडको १, बायजीपुरा १, मयूर नगर, एन-११ येथे १, अहिनेस नगर १, जयभवानी नगर ३, मातोश्री नगर १, न्यू बायजीपुरा १, एन-१२, हडको १, गजानन नगर ५, गिरिष नगर १ , नारळीबाग १, भावसिंगपुरा १, कोकणवाडी १, राम नगर ५, लक्ष्मी नगर १, समर्थ नगर १, राज नगर, छत्रपती नगर १, सुभाषचंद्र बोस नगर १, राजेसंभाजी कॉलनी, हर्सुल १, न्यू गजानन कॉलनी २, जाधववाडी, सिद्धेश्वर नगर १, सावित्री नगर, चिकलठाणा १, गादिया विहार, शंभू नगर १, एसटी कॉलनी, एन-दोन १, एन-११, नवनाथ नगर ३, एन-११, दीप नगर ४, जाधववाडी, राजे संभाजी कॉलनी ३, हनुमान चौक, चिकलठाणा २, चिकलठाणा, पुष्पक गार्डन १, हेडगेवार रुग्णालय परिसर १, विष्णू नगर १, एन-१२, स्वामी विवेकानंद नगर १, उल्कानगरी १, नागेश्वरवाडी १, सुदर्शन् नगर, हडको १, एन पाच सिडको १, कैसर कॉलनी १, एन-दोन, ठाकरे नगर १, एन-दोन, सिडको १, गारखेडा परिसर १, जयभवानी चौक, बजाज नगर २, टाऊन सेंटर, महादेव मंदिराजवळ १, एमजीएम हॉस्पीटल जवळ १, सिद्धीविनायक मंदिराजवळ, बजाज नगर ५, दीपज्योती हाऊसिंग सोसायटी १, तोरणा हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर ३, सप्तशृंगी हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर २, जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर २, छत्रपती नगर, वडगाव ३, राम मंदिराजवळ, बजाज नगर १, चैतन्य हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर १, पळशी १०, करमाड १, पिसादेवी २, कन्नड ६, गंगापूर २ या भागातील ४४ महिला स्त्री व ९३ पुरुषांचा समावेश आहे.