महाराष्ट्र

खळबळजनक!विहिरीत आढळला मृतदेह

20 जून: कोरोनाच्या या महामारीत प्रत्येक व्यक्ती नैराश्याच्या जाळ्यात अडकतच चालला आहे.या नैराश्यला वैतागून कोणी आत्महत्येचा पर्याय निवडतो आहे तर कोणी हत्या करत आहे. जामखेड तालुक्यातील डोणगाव येथे एका विहिरीत 12 वीच्या विद्यार्थिनीचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मुक्ता वारे अशी मृत विद्यार्थिनीची ओळख पटली आहे. पोलिसांना मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू केला आहे. सदर घटना ऑनर किलिंगचा प्रकार असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तसेच तरुणीने आत्महत्या केली असावी, या दृष्टीनंही पोलिस तपास सुरू आहे. या प्रकरणी जामखेड पोलिसांनी एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.