महाराष्ट्र

मुख्यमंत्री 2 दिवसांत घेणार मोठा निर्णय!

20 जून: राज्यात सर्वत्र कोरोनाचा कहर सुरु आहे.दिवसेंदिवस अनपेक्षित कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.आणि आता अवघ्या 2 महिन्यांवर लाडक्या गणरायाचं आगमन येऊन ठेपलं आहे.याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले गणेशोत्सव आपण साधेपणाने साजर करू, गणेशमूर्तीबाबतही आपल्याला निर्णय घ्यावा लागेल असं मुख्यमंत्री म्हणाले. त्याबाबत दोन दिवसांमध्ये आपला निर्णय जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले.

– दै.झुंजार नेता लाईव्ह,बीड