बीड

बीड -कोरोनाचा कहर! आजचा धक्कादायक अहवाल

बीड-आजचा दिवस बीडकरांसाठी धक्कादायक ठरला आहे.आरोग्य विभागाच्या आणि प्रशासनाच्या अथक प्रयत्नानंतरही आज बीडमध्ये धक्कादायक पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.आज पाठवण्यात आलेल्या
77 संशयितांच्या स्वॅबपैकी 9 स्वॅब पॉझिटीव्ह आलेले आहेत तर फक्त बीड शहरात 7 रुग्ण पॉझिटीव्ह असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.तर औरंगाबादहून आलेल्या धारूर येथील ता.चिंचपूर येथे 2 रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
आज पाठविलेले स्वॅब – 77
निगेटिव्ह अहवाल – 67
पॉजिटिव्ह अहवाल – 9
2 – 21 वर्षे पुरूष व 22 वर्षे महिला – रा.झमझम कॉलनी, बीड
1 – 26 वर्षे महिला – रा. शहेनशहा नगर, बीड
4 – 40 वर्षे पुरूष, 34 वर्षे स्त्री, 10 वर्षे मुलगा, 7 वर्षे मुलगा – रा.बशिरगंज, बीड
2 – 31 वर्षे महिला, 8 वर्षे मुलगा – रा.चिंचपूर ता.धारूर (औरंगाबादहून आलेले)
या धक्कादायक अहवालानंतर बीड मध्ये सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.आता बीडकरांना आणखी काळजी घ्यावी लागणार आहे.
काळजी घ्या…गर्दी टाळा…स्वस्थ रहा…प्रशासनाच्या सूचनेचे पालन करा!

– दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड