महाराष्ट्र

127 तरुणांना मराठा आरक्षणाचा फायदा

(20 Jun) मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच एमपीएससीच्या भरतीमध्ये मराठा समाजातील 127 तरुण अधिकारी झाल्याची माहिती मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढणारे विनोद पाटील यांनी दिली आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 13 ते 15 जुलै 2019 या दरम्यान मुंबई, औरंगाबाद, नागपूर आणि पुणे या परीक्षा केंद्रावर 420 पदांसाठी राज्यसेवा मुख्य परीक्षा घेतली होती. एका वर्षानंतर शुक्रवारी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला.’मराठा आरक्षणामुळे जवळपास 127 तरुण विद्यार्थी अधिकारी झाले.