बीड- पालकमंत्री धनंजय मुंडे कोरोनामुक्त
बीड-पालकमंत्री धनंजय मुंडे तसेच त्यांचे स्वीय सहाय्यक आणि वाहन चालक हे तिघे ही शनिवारी (दि. 20) कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्णालयातून त्यांना लवकरच सुट्टी देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
पालकमंत्री धनंजय मुंडे, त्यांचे स्वीय सहाय्यक व वाहन चालक यांना कोरोना झाला होता. मुंबईच्या एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. शनिवारी ते कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे. दरम्यान मुंडे कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.