भारतीय कर्णधाराचे कुटुंब कोरोनाच्या विळख्यात!
दि.20 जून भारताचा लोकप्रिय कर्णधार,क्रिकेट जगातील अनेक विक्रम स्वतः च्या नावे करणारा, दादा नावाने सुप्रसिद्ध असणाऱ्या व सध्या बीसीसीआय चे अध्यक्षस्थान भुषवणाऱ्या टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर येत आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनचे सचिव स्नेहशीष गांगुली यांच्या कुटुंबातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागानं दिली.
स्नेहशीष हे सौरव गांगुलीचे मोठे बंधू आहेत. स्नेहशीष यांची पत्नी, सासू आणि सासरे यांना कोरोना लागण झाल्याचे समोर आले आहे. स्नेहशीष यांच्या घरी काम करणाऱ्या व्यक्तीलाही कोरोना झाल्याचे नुकतेच समोर आले होते.
काळजी घ्या…गर्दी टाळा…स्वस्थ रहा…!
-दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड